Friday 12 September 2014

बेरड'

नुकतंच 'भीमराव गस्ती' यांचं 'बेरड' हे आत्मकथन वाचनात आलं.पुस्तक वाचताना राहून-राहून असं वाटत होत कि फार उशीराच हे पुस्तक हातात पडलं..या अगोदरच हे पुस्तक वाचनात यायला पाहिजे होत.सामाजिक क्षेत्रात कार्य कराव कि नोकरी करून आपला धर्म सांभाळावा अशी द्विधा मनस्थिती असणाऱ्यांसाठी हे आत्मकथन नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतं!तसेच समाजहितासाठी नव्याने संघटना बांधू पाहणाऱ्या,चळवळ उभी करू पाहणाऱ्या सळसळत्या रक्ताच्या तरुणाईला एक दिशा देण्याचं कामही चोखपणे बजावतं.

अजून एका कारणासाठी या पुस्तकाचा उल्लेख महत्वाचा ठरतो..कालच्याच वर्तमानपत्रात (लोकसत्ता,११ सप्टेंबर २०१४)पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातल्या 'देवदासी' प्रथेविषयी बातमी आली होती.गस्तींच्या' आत्मकथनात हि या प्रथेचा माहितीवजा उल्लेख आहे.खरंतर पुस्तक लिहून आता बरीच वर्ष उलटलीत..पण देवदासी प्रथेच स्वरूप,ठिकाण,प्रमाण यात कसलाही बदल नाही.इतक्या वर्षांनंतरही ही प्रथा अजून सुरूच आहे..महाराष्ट्र शासनाने ही प्रथा नष्ट व्हावी म्हणून कायदाही केला आहे.पण लाभार्थी लाखो संख्येने असताना काही हजार देवदासीनाच अनुदानाचा लाभ मिळतो..मग उर्वरित देवदासींचं काय?याच उत्तर शासनाकडे तरी असेल का?या मिळणाऱ्या अनुदानाचा आकडा पहिला तर तो सुद्धा नक्कीच धक्कादायक आहे..मग अशा वेळी या देवदासी वेश्याव्यवसायाकडे वळणार नाहीत तर नवलच!तसंच ज्याला आपण 'समाज' कि काय  म्हणतो 'तो'सुद्धा याला तितकाच कारणीभूत आहे म्हणा!

हे पुस्तक अजून एका गोष्टीच महत्व अधोरेखित करतं..ते म्हणजे 'वर्तमानपत्रं'!आमच्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक का असावं असा विचार पुस्तकाची शंभर एक पानं वाचून होईपर्यंत मनात येत होता..पण गस्तींच्या चळवळीला,समाजकार्याला वर्तमानपत्रांनी दिलेली साथ कुठंतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन गेली.उपेक्षितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याच काम वर्तमानपत्रांनी तेव्हाही केलं होतं आणि आजही करत आहेत!!

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...