Saturday 28 November 2015

काचेचा काैल

घरावरच्या कौलांमध्ये दिवसा घरात उजेड पडावा आणि विजेचा वापरही कमी व्हावा यासाठी धुरांडीच्याच समोरच्या बाजूला एक काचेचा कौल बसवला जातो. रात्रीच्या वेळी या कौलातून बघण्याचा प्रयत्न केल्यास चांदोबा दिसतो. दिवसा उजेडाचं उनही दिसतं. योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी दाखवण्यासाठी हा कौल महत्त्वाचा. काचेच्या कौलाचा मूळ गुणधर्म म्हणजे त्याच्या पलीकडे जे असतं तेच अलीकडे दिसतं. पण हा कौल बनवण्यामागे, तो इतर कौलांबरोबर बसवण्यामागे काहीतरी चांगला हेतू असतो. आणि तो साध्यही होतो. त्या कौलाला वास्तव कळावं, त्याने तेच वास्तव समजून घ्यावं आणि तेच प्रदर्शित करावं हेच अपेक्षित असतं..त्यामुळे बराचसा बर्याच गोष्टींचा अपव्ययही टळू शकतो आणि त्या गोष्टी इतरत्र नक्कीच उपयोगी पडू शकतात. आपल्या मेंदूचंही असंच काचेच्या कौलासारखं असतं. त्याचा वापर कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मेंदूचं शरीरातलं स्थान आणि महत्व लक्षात घेता तो योग्य कारणांसाठीच वापरला जात असेल तर चांगलंच पण तसं नसेल तर मेंदूचा भाग असण्यात आणि नसण्यात फारसा फरक नसतोच.. मेंदूनेही डोळस असावं. निदान सत्य पडताळून बघण्याइतकं तरी!

मासिके

एका मासिकाच्या आॅफिसात काम करणे म्हणजे इतर अनेक मासिकांची मेजवाणीच असते. मी माझ्या लहानपणी जितकी मासिकं पाहिली नसतील तितकी मासिकं इथं एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. मुंबईच्या एका म्युनिसिपालीटीच्या मराठी शाळेत ही मासिकं आम्हाला पाहायला सुद्धा कधी मिळाली नाहीत. किशोर मासिकाचं फक्त नाव एेकलं होतं इथं प्रत्यक्ष पाहिलं. अशी सुंदर सुंदर चित्र आणि गोष्टी असलेली मासिक लहानपणापासून वाचायला मिळाली तर मुलं नक्कीच संस्कारक्षम होतील. पालकांना तसाही आजकाल मुलांसाठी वेळ नसतो अशावेळी त्यांनी निदान मुलांना वाचनाची सवय लावली तरी खूप आहे. बाकी ही मासिक मुलांसाठीच तर आहेत..

सिग्नल

बाकीच्या मुलांसारखे ते नऊ वाजेपर्यंत झोपत नाहीत. छान सुगंधी साबनाने आंघोळही करत नाहीत. हा पण केसांचा भांग पाडतात. आज पाहिलं मी. पुलगेटच्या आधीच्या सिग्नलला राहतात ते. जाहिराती लावलेल्या खांबांच्या आधाराने.. त्याच्यावर सामान ठेवून. बाकीचं सगळं मागच्या सिमेंटच्या कट्ट्यावर..आज सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे सिग्नलला थांबलो तेव्हा पाहिलं ती छोटी भावंड भांग पाडत होती. दोघांच्या अंगात एकसारख्याच रंगाचा ड्रेस. बहुदा शाळेचा असावा. आकाशी आणि पांढर्यावर रेघा असणारा.. मुलानं खोबरेल तेलाची बाटली सारखं काहीतरी खांबावरच्या फळीवर ठेवलं त्या मुलीनं पळत जाऊन कंगवा पिशवीत टाकला. ते पाहून बरं वाटलं .. म्हटलं आता ही नक्की शाळेत जाणार असावीत पण.. पोरानं गोल वाजवायचं काहीतरी घेतलं.. आणि ते दप्तर तरी नक्कीच नव्हतं.
इकडं बसमध्ये एक दिवसाआड तरी भांडण होतात ,' डावी बाजू महिलांची म्हणून'. अपंग, गर्भवती महिला, वृद्ध, पत्रकार सगळ्यांसाठी जागा असतात. �हे फक्त बसचं उदाहरण.
बाहेरचा पसारा इतका आहे की हे बापुडे या सगळ्यापासून सुटत राहतात.. कसे काय ते कळत नाही..

Thursday 26 November 2015

कावळे आणि ..

आमच्या गावच्या घरासमोरून विजेच्या खांबाच्या तारा जातात . त्यावर कावळे हमखास बसायचे. जास्तकरून सकाळच्या वेळीच. ते असे आेळीने बसलेले दिसले की वस्तीवरची सगळी असलेली नसलेली वारस बेवारस कुत्री त्यांच्यावर भुंकायला सुरुवात करत असत. कावळा ही बोलून चालून पक्षाची जात. ती कुठेही बसणार .. पण आता कुत्र्यांना ते समजवायचं कोणी ? कुत्र्यांनी तारेवरच्या कावळ्यांवर भुंकण्यासाठी स्वतःला डेव्हलप केलं. पण कावळ्यांना भुंकणं कळणं केवळ अशक्य. जास्त लांबड लावत नाही ..भुंकणं हा कुत्र्याचा स्वभावधर्म असला तरी सरसकट भुंकणं अपेक्षित नसतंय. पण कदाचीत कुत्र्यालाही गर्व झाला असावा. कावळ्यांनी तारेवर बसण्यात विचित्र वेगळं असं काही नाही. तर मुद्दा असा की या आपलं एक मिनिटं मनोरंजन करण्याच्या गोष्टी आहेत. त्या पलीकडं यातून काही निष्पन्न होणार नसतं. तर आपापल्या कामाला लागणं चांगलं!

Saturday 26 September 2015

रानडे ..

आज खूप दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा योग आला .. आजपण ते तितकंच शांत वाटलं .. कदाचीत ती मनाची अवस्था असेल .. तिथं गेल्यानंतर तसं शांत वाटलं असेल .. गेटच्या आत इथलं जगच वेगळं आहे .. खासकरून तिथली झाडं .. तिथली शांतता ..

गेटमधून आत एण्ट्री करताना जर पाला पडला असेल तर तो तुडवत पुढे जाताना आपण कोणीतरी स्पेशल आहोत असं वाटतं .. गेट ते पहिली पायरी स्वतःच्या नादात एकदम निवांत चालायचं .. मस्त वाटतं ..

आजपण आठवण आली की हुरहूर वाटतेच .. तिकडे जाणं टाळते खरंतर .. गेलं की लायब्ररी कडे जावंसं वाटतं .. त्यातल्या १६ नंबर च्या कपाटासमोर उभं राहावंसं .. त्याच्या धूसर काचेत स्वतः चं प्रतिबिंब शोधावंसं वाटतं .. प्रत्येक ठिकाणी अस्तित्वाचा एक भाग सोडून आल्यासारखं आहे काहीतरी ..

थोरले बंधु आणि मी आलो होतो तो पहिला दिवस आजही तसाच आठवला .. हे ठिकाण समृद्ध बनवतं हे विशेष .. इथल्या वातावरणात बदलवण्याची ताकद आहे !

असं वाटतं ते कट्टे पण बोलतात ..येता - जाता थांबा म्हणतात .. त्या खुर्च्या कायम पोरांच्या प्रतिक्षेत असतात .. आहेत .. खरंतर पोरं आहेत म्हणून ते ही जिवंत आहे ..

Monday 7 September 2015

बाकी काही नाही ..

काही लोकं लवकर भेटतात .. काही उशीरा .. काही जाता - जाता ..
यातील कोणासाठीही वेळ देणं म्हणजे ..
भविष्यातील दुःखाला निमंत्रण !
प्रत्येकजण चुटपुट लावून जातो ..
बाकी काही नाही ..

Sunday 6 September 2015

.. आणि मला आवाजात बोलायचंय

स्वतःच्याच कानावर हात ठेवून स्वतः चा आवाज एेकण्यात मज्जा असते . लहानपणी ही करामत खूप वेळा केली .
फोनवर बोलताना पण कधीकधी आपलाच आवाज आपल्याला एेकू येतो . स्वतः चा आवाज एेकण्यात पण गंमत वाटते .
पण आता कोणीच कोणालाच जास्त फोन करत नाही . फक्त मॅसेज .
कोणाशी जास्त बोलायची गरज पडत नाही . मॅसेज मध्येच बोलायचं , हसायचं , रागवायचं , रडायचं ..
सगळेच आणि सगळंच आॅनलाईन ..
तरी बरं आहे, आईकडे वाॅटसअॅप नाही ..
एकूण काय ,
वॉटस अॅप आणि फेसबुक आवाज दाबून टाकत आहे .
.. आणि मला आवाजात बोलायचंय .

Sunday 16 August 2015

" पहा पण प्रेमाने "

आम्ही नववीला असताना " पहा पण प्रेमाने " हे बरंच प्रसिद्ध असणार वाक्य !
पोरांच्या सायकलीच्या चेन कव्हर वर , शाळेत जायच्या रस्त्यावर , वर्गातल्या भिंतीवर , इतकंच नाही तर अगदी भिंतीवर जे तक्ते लिहिले होते त्यात पण एका तक्त्यात लिहून ठेवलं होतं !

शाळा सुटल्यावर मॅडमनी रितसर चौकशीसाठी थांबवलं होतं . कोणी लिहिलं असेल विचारायला. गंमत म्हणजे हे असं काही लिहिणारे कधीच सापडत नसायचे . ज्यांनी कोणी शोध लावला तो ग्रेटच..

आज एका रिक्षाच्या मागं " तुमच्यासाठी काय पण " लिहिलं होतं त्यावरून आठवलं..

फरक एवढाच हे पुणे आहे
अन ते गाव होतं ..
काही असो ,
कुठही जा ! या वाक्यात दम आहे !!

..साचा !

कुठंही जा प्रत्येकाकडं एक न दिसणारा साचा असतोय . तुम्हाला त्या साच्यात बसवण्याचं काम तुमच्याही नकळत केलं जातं . याला माणसं घडवणं म्हणावं की अजून काही ? अगदी स्वतःला पाहीजे तशी माणसं घडवली जातात . हा साचा म्हणजे विचारसरणी . या साच्यामध्ये बसायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं . कुठं झुकायचं आणि कुठं नाही हा सुद्धा तुम्हीच सोडवायचा प्रश्न . स्वतःची मत , तत्व नसतील तर गपगुमानं तुम्हाला या साच्यात अॅडजस्ट व्हावं लागतं नाहीतर तुम्हाला बाहेरचा रस्ता पकडण्याची मुभा असतेयंच . तुम्हाला काही बोलण्याची / करण्याची / बदलण्याची संधी मिळेलंच असं नाही .
पण तरीही एक पर्याय इथून-तिथून खुला असतोय..
तो साचाच तोडण्याचा..
तसा प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही असं मला तरी वाटतंय..

" मुक्काम पोस्ट कोसला !! "

ज्या दिवशी कोसला संपलं त्या दिवशी एकच वाटलं की आपण लय म्हणजे लय म्हणजे लय मुर्ख आहोत . जगातल्या सगळ्या फालतू प्रश्नांना कवटाळून जगतोय . अन ठरवून टाकलं आता पाहिजे तसं जगायचं ! दुनिया गेली ..

कोसला मध्ये असं काहीतरी आहे की जे शब्दांत पकडता येत नाही. अदृश्य असा कैफ चढतो की नंतर सगळंच शून्य वाटायला लागतं. आजवर वाचलं ते कोसला पुढं काहीच नाही आणि इथून पुढे जे वाचलं जाईल ते पण कोसला च्या तोडीच्या अपेक्षेने !

कोसला वाचल्यानंतर समाधान मिळण्याऐवजी अस्वस्थता वाढलीय. मेंदू अजून काहीतरी शोधतोय किंवा मेंदूच्या अपेक्षा अजून वाढल्यात. कोसलाने डोक्याचं वारूळ केलं आणि प्रश्नांच्या मुंग्या सोडल्या .

कोसला प्रत्येक मध्यम वर्गीय मनाचं आणि पांडुरंग प्रत्येक मध्यम वर्गीय तरूणाचं प्रतिनिधित्व करतोय असं वाटलं..

- मुक्काम पोस्ट
कोसला
अविधा
१७ मे २०१५

..पुलं आणखी कोण !!

पुलं ची पुस्तकं म्हणजे नदीच तुडूंब भरलेलं पात्रं . डुबकी मारावी .. पाण्याने सर्वांगाला स्पर्श करावा तसा त्यांचा प्रत्येक शब्द मनाला फक्त स्पर्शच करत नाही तर गुदगुल्याही . आपण वाचत जातो तसे त्यांचे शब्द काठाला हळूवार धक्का देणार्या पाण्यासारखे स्पर्श करतात.. ती हलकीशी छोटी लाट येते.. आेसरते .. लाटेखालच्या लाटेलाही गोंजारते .. त्यांची पुस्तकं वाचून आरामात बाजूला ठेवता येतात आणि आपल्या कामाला लागतं येतं . डोकं शांत-शांत होतं . घरात वरती कुठेतरी आढ्याला कापडात नारळ बांधलेला असतो . त्याच्याप्रती एक श्रद्धा असते . आधार असतो तशी पुलं ची पुस्तकं . प्रत्येक घरातल्या आयुष्यांचा प्रत्येक पदर उलगडणारी !!

.. अग्रलेख !

" राजकारणावर लिहिता का ? "
" नाही "
" तुम्हाला लगेच अग्रलेखच लिहायचे असतात !"
" .... "
"हलकं फुलकं ?"
"हो"
"ते आमच्याकडे खूप आहे."
" .... "

Thursday 13 August 2015

.. माणसाव्यतिरिक्त !

माणूस सोडून अजून काय-काय होता येईल आणि कुठे-कुठे जन्म घेता येईल असा सहज विचार केला.. आणि ........
ध्रुवावर !
पेंग्विन बनायचं !
बर्फच बर्फ !
सगळ्या बर्फात गडगड लोळणार !
त्यानंतर मासा !
देवमासा !
समुद्रातला ! ( समुद्रातच असतोय नाही का..
अजून...
डॉल्फिन !
पण मी लोकांना पाण्यात अजिबात उड्या मारून दाखवणार नाही !
त्यानंतर प्रचंड खडबडीत खोड असलेलं झाड..
पण जंगलातलं.. नाहीतर बाहेर करमणार नाही.
किंवा
एखादा रंगीत पक्षी ..
पण एकदम नवीन प्रकारचा..
सध्यातरी इतकंच ..
पण तुम्ही कुठं असणार त्यावेळी ?

Thursday 11 June 2015

काही वाचनीय Blogs..

सीमोल्लंघन
http://simollanghan.blogspot.com/

वैश्विक
http://vaishwik.blogspot.com/

रेघ
http://ekregh.blogspot.com/

kumar ketkar
http://kumarketkar.blogspot.com/

वाचू आनंदे!!
http://vachuanande.blogspot.com/

इतिहासात..या दिवशी..
http://itihasatyadivshi.blogspot.com/

कानगोष्टी
http://kangoshti.blogspot.com/

चिन्ह
http://chinhatheartblog.blogspot.com/

पुस्तके नवी-जुनी...
http://muktvachan.blogspot.com/

अभिजात
http://nandini-atmasiddha.blogspot.com/

KUHOO कुहू
http://ku-hoo.blogspot.com/

Abhi's Blog
http://civilserviceindia.blogspot.com/

Abhijeet Agrawal's Blog
http://abhijeetagrawal.blogspot.com/

Ajay Katesaria
http://ajaykatesaria.blogspot.com/

An IAS Officer's Blog
http://shubhra-saxena.blogspot.com/

CIVIL SERVICES LATEST SYLLABUS 
http://ratendrapal.blogspot.com/

Devesh Kumar Mahla
http://deveshmahla.blogspot.com/

Dilip Simeon's blog
http://dilipsimeon.blogspot.com/

gurutv
http://gurutvakarshan.blogspot.com/

Hyd&Spook
http://hyd-n-spook.blogspot.com/

IAS ASPIRANTS...
http://iasaspirations.blogspot.com/

IAS EXAM PREPARATION ROADMAP ...
http://bijayketanupadhyayaias.blogspot.com/

IAS OUR DREAM
http://swapsushias.blogspot.com/

Just another blog
http://seriouslysollu.blogspot.com/

Just simple........
http://anuragsbuzz.blogspot.com/

Kora Kaagaz
http://vikrampagaria.blogspot.com/

Musings from Temple City
http://kiranmahasuar.blogspot.com/

MY NATION STUFFED WITH PROBLEMS YET STANDING TALL
http://drajaysharma.blogspot.com/

My Strategy
http://garima-mittal-ias.blogspot.com/

NIRMAN for Education and the Arts, Varanasi, India
http://nirmaninfo.blogspot.com/

On A Serious Note...
http://intellection-rajiv.blogspot.com/

Raid D Himalayas
http://raiddhimalayas.blogspot.com/

Shahanisha
http://shahanisha.blogspot.com/

sunshine "a ray of hope"
http://wwwrashmitapanda.blogspot.com/

The IAS Dream
http://thecivilservicesdream.blogspot.com/

The Lost Maverick
http://dlostmaverick.blogspot.com/

UPSC Aspirant
http://ashutoshupsc.blogspot.com/

UPSC Civil Services Exam
http://ghanshyamthori.blogspot.com/

Tuesday 9 June 2015

शिवाजी कोण होता?

शिवाजी राजांचं चरित्र आणि ही चरित्र कशी आत्मसात केली गेली..रूजवली गेली याची चिकित्सा यात नक्कीच फरक आहे.मुख्य मुद्दा असा, शिवाजी राजांबद्दल सगळेच लहानपणापासून वाचत आलोय तर मग पुन्हा ' शिवाजी कोण होता?' वाचण्यात काय हशील?

एखादी संकल्पना तिच्या मूळ रूपात जशीच्या तशी पुढे हस्तांतरीत होत असेल तर चांगलच.ही संकल्पना, त्यासंबंधाने जोडून येणारी इतर माहिती, घटना, व्यक्ती, त्यांचे विचार, तत्वं यांची आपल्या दैनंदिन व्यवहारांशी योग्यरितीने सांगड घालणं ही तितकच महत्त्वाचं..पण याच विचारांत जर कुणी जाणीवपूर्वक बदल करत असेल की जो समस्त जनांसाठी अहितकारी ठरणार असेल तर याला वेळीच आवर घालणंही तितकच गरजेचं असतं! शिवाजी राजे ही असाच एक विचार आहेत! पिढ्यानपिढ्या चालत आलेला..तो विचार आत्मोन्नती, समाजोन्नती आणि देशोन्नती कडेच घेऊन जाणारा आहे. परंतु आता तो त्यांच्या मूळ स्वरूपात आहे का याची चिकित्सा म्हणजेच, "शिवाजी कोण होता" हे पुस्तक!

सद्यस्थितीला जनताजनार्दनाची अडचण अशी की धर्म ही आता त्यांची दुखरी नस आहे. त्यामुळे जनमनातील धर्म दुखावेल असं काही झालं की धर्मवेडे धर्मयुद्ध छेडू पाहतात. पण त्यावेळी फक्त बदला अपेक्षित असतो. पण अशाने कुणाचाही धर्म मोठा किंवा लहान होत नाही.धर्माचं लेबल लावलेला मात्र जिवानिशी जातो. फक्त वर्चस्वाची भावना असते जी धर्मांध बनवते. यामगील एक कारण सांगता येईल की चुकीच्या गोष्टीचं उद्दातीकरण! आणि हे अपुऱ्या माहीतीच्या आधारे केलेलं असतं.हे उद्दातीकरण रास्त ठरवण्यासाठी मूळ संकल्पना माहित असणं गरजेचं. शेवटी ज्याचा विवेक जागा आहे, जो सारासार विचार करू शकतो तो नक्कीच आंधळेपणाने कोणतीही कृती करणार नाही आणि असं काही करणार्यांना पाठीशी ही घालणार नाही.

कुणाचेही आंधळे अनुयायी बनण्यापेक्षा स्वतःच्या मेंदूवर काही गोष्टी घासून पाहिल्या तर योग्य अयोग्य विचारातली तफावत लक्षात येतेच! तसंही ज्या शाळांनी इतिहास शिकवला त्यांनीच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा हे ही सांगितलं होतच की..शेवटी सत्य हे शाश्वत आणि चिरकाल टिकणारं असतं! कशाचाही अतिरेक हा विनाशीच असतो शेवटी..

राजांना हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून स्वीकारण्यापेक्षा एक उद्दात विचार म्हणून स्वीकारलं तर बरेचसे प्रश्न सुटतील अशी आशा वाटते..आणि हा विचार मूळ स्वरूपातच आपल्यात रूजावा म्हणून 'शिवाजी कोण होता?' हे कॉ. गोविंद पानसरे लिखित पुस्तक प्रत्येकाने एकदातरी वाचावे!

Sunday 7 June 2015

आजवरचा वाचन प्रवास..

माझे शंभर एक..

१ चौघीजणी - शांता शेळके
२ फसलेला क्षण - वि. स. वाळिंबे
३ वेताळकोठी -
४ डार्करूम - बाबा कदम
५ राही - बाबा कदम
६ कोमा - डॉ. रॉबिन कुक
७ शापित सौंदर्य - जनार्दन कदम
८ उपरा - लक्ष्मण माने
९ फकिरा - अण्णा भाऊ साठे
१० आवडी - अण्णा भाऊ साठे
११ वारणेचा वाघ - अण्णा भाऊ साठे
१२ चित्रा - अण्णा भाऊ साठे
१३ शारदा संगीत - प्रकाश नारायण संत
१४ पंखा - प्रकाश नारायण संत
१५ वनवास - प्रकाश नारायण संत
१६ चांदण्याचा रस्ता - प्रकाश नारायण संत
१७ झुंबर - प्रकाश नारायण संत
१८ चंद्रमुखी - विश्वास पाटील
१९ श्रीमानयोगी - रणजित देसाई
२० धिंड - शंकर पाटील
२१ बेछूट - अशोक थोरे
२२ सागरकन्या -
२३ वपुर्झा - व पु काळे
२४ तुफान -
२५ लक्ष्यवेध - रणजित देसाई
२६ अग्निपंख - डॉ कलाम
२७ सैतानघर -
२८ मृत्युंजय - शिवाजी सावंत
२९ ययाति - वि स खांडेकर
३० डॉ आयडा स्कडर -
३१ हुंदका -
३२ वारस -
३३ मी तुझी तुझीच रे -
३४ निशिगंध कथासंग्रह -
३५ रतन - बाबा कदम
३६ आय डेअर - किरण बेदी
३७ मी माझी -
३८ बानू - देवदत्त पाटील
३९ शितू - गो नी दांडेकर
४० पांढरे मेघ - वि स खांडेकर
४१ हिरवा चाफा - वि स खांडेकर
४२ शापित वास्तू -
४३ बोक्या सातबंडे - दिलीप प्रभावळकर
४४ शेरलॅक होम्सच्या कथा - भालबा केळकर
४५ डॉ बाबासाहेब आंबेडकर - भारतीय  स्वातंत्र्याचा इतिहास श. गो. कोलारकर
४६ गणगोत - पु. ल. देशपांडे
४७ बटाट्याची चाळ - पु. ल. देशपांडे
४८ देव ? छे! परग्रहावरील अंतराळवीर - बाळ भागवत
४९ यु कॅन विन - शिव खेरा
५० स्वप्नाकडून सत्याकडे - माधुरी शानभाग
५१ श्यामची आई - साने गुरूजी
५२ अभयारण्य - जयंत नारळीकर
५३ एक मोठा एक छोटा -
५४ हकनाक -
५५ स्टील फ्रेम - फारूक नाईकवडे
५६ सत्याचे प्रयोग - म. गांधी
५७ फाईव्ह पॉइंट समवन - चेतन भगत
५८ द अॅल्केमिस्ट -
५९ यशशास्त्र - अब्दुल सलाम चाऊस
६० टू दि लास्ट बुलेट - विनिता कामटे
६१ सुनिता विल्यम्स - चित्रा वाळींबे
६२ पार्टनर - व पु काळे
६३ येस वुई कॅन _- राजा कांदळकर
६४ आमचा बाप आणि आम्ही - डॉ नरेंद्र जाधव
६५ असा मी असामी - पु. ल. देशपांडे
६६ गारंबीचा बापू - श्री ना पेंडसे
६७ नटसम्राट - वि वा शिरवाडकर
६८ देव्हारा -
६९ राजमुद्रा -
७० धडपडणाऱ्या तरूणाईसाठी - संदिपकुमार साळुंखे
७१ महाश्वेता -
७२ तीन मुले - साने गुरुजी
७३ निराकार -
७४ गावगुंड -
७५ बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
७६ अंकुरच कुस्करला -
७७ बोर्डरूम - अच्युत गोडबोले
७८ सर आयझॅक न्यूटन -
७९ लुई ब्रेल -
८० पापी फरिश्ता -
८१ दौलत - ना सी फडके
८२ प्रतिक्षा -
८३ साहसी टॉम -
८४ फास्टर फेने - भा. रा. भागवत
८५ थ्री मिस्टेक्स.... - चेतन भगत
८६ रूपाळी -
८७ तुत्स्ना -
८८ चाणक्यनिती -
८९ शेरपा तेनसिंग -
९० सीमारेषा -
९१ डेझर्ट क्वीन - बाबा कदम
९२ चिनार - बाबा कदम
९३ शाळा - मिलिंद बोकील
९४ शेक्सपीअर -
९५ सुशीलकुमार शिंदे -
९६ डॉक्टर -
९७ समिधा - साधना आमटे
९८ निशाचर -
९९ प्रकाशवाटा - डॉ प्रकाश आमटे
१०० झाडाझडती - विश्वास पाटील
१०१ ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक आेबामा
१०२ डोह - श्रीनिवास कुलकर्णी
१०३ आमचा पण गाव - चि वि जोशी
१०४ माझी जन्मठेप - सावरकर
१०५ माती पंख आणि आकाश - ज्ञानेश्वर मुळे
१०६ अजिंक्य - बाबा कदम
१०७ बलुतं - दया पवार
१०८ आई समजून घेताना - उत्तम कांबळे
१०९ गरूडझेप - भरत आंधळे
११० ताई मी कलेक्टर व्हयनू - राजेश पाटील
१११ या सत्तेत जीव रमत नाही - नामदेव ढसाळ
११२ बेरड - भीमराव गस्ती
११३ लव्ह जिहाद - सुनीला सोवनी
११४ माणसं - अनिल अवचट
११५ आकांत - सुबोध जावडेकर
११६ गोदान - प्रेमचंद
११७ एक गाव एक पाणवठा - बाबा आढाव
११८ १७ वे वर्ष - पु भा भावे
११९ घालमेल - शंकर पाटील
१२० रामप्रहर - विजय तेंडुलकर
१२१ म्हैसाळ दलित मुक्तीचा एक प्रयोग - वसंत देशपांडे
१२२ कोसला - भालचंद्र नेमाडे
१२३ तोत्तोचान - चेतना सरदेशमुख गोसावी
१२४ शिवाजी कोण होता? - कॉ. गोविंद पानसरे
१२५ रानातल्या कविता - ना धो महानोर
१२६ सांजभयाच्या साजणी- ग्रेस
१२७ तुही यत्ता कंची? तुही यत्ता? - नामदेव ढसाळ
१२८ कोल्हाट्याचं पोर - किशोर शांताबाई काळे
१२९ गोलपीठा - नामदेव ढसाळ
१३० सारे प्रवासी घडीचे - जयवंत दळवी
१३१ हिंदू
१३२ उचल्या ... ( अपूर्ण )
१३३ निळ्या डोळ्यांची मुलगी - शिल्पा कांबळे
१३४ हूल - भालचंद्र नेमाडे
१३५ जरीला - भालचंद्र नेमाडे
१३६ लव्हाळी - श्री ना पेंडसे
१३७ जैतापुरची बत्ती - मधु मंगेश कर्णिक
१३८ पाडस - राम पटवर्धन
१३९ एरवी हा जाळ
१४० बिढार - भालचंद्र नेमाडे ( अपूर्ण)
१४१ द ब्रेडविनर - डेबोरा एलिस
१४२ सांजशकुन - जीए
१४३ भूमी - आशा बगे
१४४ नॉट विदाऊट माय डॉटर -
१४५ आेमियागे - सानिया
१४६ देनीसच्या गोष्टी - व्हिक्टर ड्रॅगुन्स्की
१४७ दृष्टी - अनंत सामंत
                     (१९ मे २०१६)
१४८ कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
१४९ द फ्री व्हॉइस - रवीश कुमार (अनुवाद - मुग्धा       कर्णिक)
१५० आय ऍम अ ट्रोल - स्वाती चतुर्वेदी (अनुवाद - मुग्धा कर्णिक)

Sunday 31 May 2015

तोत्तोचान

खरंतर तोत्तोचानबद्दल लिहीण्यासारखं खूप आहे...एक अत्यंत खोडकर, जिज्ञासू, अति उत्साही अशा छोट्या जपानी मुलीची ही कथा..सतत शाळेच्या खिडकीत उभी राहणारी..खिडकीतून रस्त्यावरच्या बँडवाल्यांना हाका मारून बोलवणारी..चिमण्यांना "तुम्ही काय करताय असं विचारणारी"..रस्त्यात दिसेल त्या ढिगाऱ्यांत काहीही विचार न करता धपकन उडी मारणारी..राॅकी नावाच्या तिच्या छोट्या कुत्र्यावर जिवापाड प्रेम करणारी..आणि विशेष म्हणजे इयत्ता पहिलीतच शाळेतून काढून टाकलेली 'तोत्तोचान''..

आपल्याला नक्की काय व्हायचंय या गोंधळात अडकलेली तोत्तोचान कधी तिकीटांची विक्री करणार असं म्हणते तर कधी नृत्यांगना व्हायची स्वप्न पाहते..तर कधी बँडवाल्यांचात जायचंय असंही सांगते..पण सरतेशेवटी तिची जडणघडण 'तोमोई' शाळेत इतक्या सुंदर पद्धतीने होते की ८ वर्षांची तोत्तोचान 'तोमोई' शाळेतच शिकवायला यायचं आहे असं वचन तिच्या मुख्याध्यापकांना देते..

तसेच ही कथा तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या पण तिच्या जिज्ञासूवृत्तीला प्रेरणा देणाऱ्या पालकांची..तोमोईसारख्या अतिशय कल्पकतेने बनविलेल्या शाळेची..शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याची..

तसं पुस्तक खूप जुनं आहे..एव्हाना प्रत्येकानं वाचलं असेल..तरीहि खूपसं बोलावं यावर असंच हे पुस्तक आहे..शिक्षणपद्धती कशी असावी यावर भाष्य करणार हे पुस्तक..
मुलातलं मुल कसं जपावं..त्याचं बालपण कसं उलगडत न्यावं याचं सुंदर वर्णन असलेली ही कथा..

यातील दखलपात्र गोष्ट म्हणजे तोमोई शाळा.मुलांना संपूर्ण निसर्गाची प्रयोगशाळा खुली करून देणारी..शाळेच्या चार भिंतीत बंदिस्त न करता प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात धडे गिरवायला लावणारी..विशेष म्हणजे ही शाळा आगगाडीच्या डब्यात भरवली जायची..पण शेवटी अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात नष्ट झालेली..
अशाच शाळेची कल्पना मला वाटतं रवींद्रनाथ टागोरांनी देखील मांडली होती.

मनोरंजनापलीकडेही ही कथा आपल्याला खूप काही सांगून जाते..तोत्तोचान सारखी एखादी मुलगी आपल्या सभोवती असेल तर?लहान मुलांची जिज्ञासावृत्ती आपल्याकडे किती जपली जाते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे..लहान मुलांनी प्रश्न विचारायचे असतात, खूप प्रश्न विचारायचे असतात.पण त्यांना या सगळ्यांचीच उत्तर मिळतात असं नाही..तर मिळतो पाठीवर एक धपाटा आणि 'जा बाहेर खेळायला' हा उपदेश!

तोमोई शाळा अभ्यासक्रमातल्या कितीतरी संकल्पना निसर्गाच्या प्रयोगशाळेतून मुलांना शिकवायची..अशा शाळा खूप काही घडवू शकतात..निदान सध्याच्या गळेकापू स्पर्धेतून मुलांची सुटका तरी करू शकतात.इतरांच्या दोषावर टीकाटिपण्णी करण्यापेक्षा, एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्याची शिकवण देऊन ..सध्या अभावानेच आढळणारी व्यवसाय करण्याची मानसिकता लहानपणापासून तयार करू शकतात.

कितीतरी अनोख्या गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात.ज्या-ज्या घरात 'श्यामची आई' असेल त्या-त्या घरात तोत्तोचानही असेल अशी आशा निर्माण झाली आहे..कुठंतरी आपणही असे सृजनात्मकतेला वाव देणारे पालक, मित्र, मार्गदर्शक, शिक्षक, शाळा आणि समाज बनावं असंही वाटू लागलं आहे..

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...