Sunday 16 August 2015

" पहा पण प्रेमाने "

आम्ही नववीला असताना " पहा पण प्रेमाने " हे बरंच प्रसिद्ध असणार वाक्य !
पोरांच्या सायकलीच्या चेन कव्हर वर , शाळेत जायच्या रस्त्यावर , वर्गातल्या भिंतीवर , इतकंच नाही तर अगदी भिंतीवर जे तक्ते लिहिले होते त्यात पण एका तक्त्यात लिहून ठेवलं होतं !

शाळा सुटल्यावर मॅडमनी रितसर चौकशीसाठी थांबवलं होतं . कोणी लिहिलं असेल विचारायला. गंमत म्हणजे हे असं काही लिहिणारे कधीच सापडत नसायचे . ज्यांनी कोणी शोध लावला तो ग्रेटच..

आज एका रिक्षाच्या मागं " तुमच्यासाठी काय पण " लिहिलं होतं त्यावरून आठवलं..

फरक एवढाच हे पुणे आहे
अन ते गाव होतं ..
काही असो ,
कुठही जा ! या वाक्यात दम आहे !!

..साचा !

कुठंही जा प्रत्येकाकडं एक न दिसणारा साचा असतोय . तुम्हाला त्या साच्यात बसवण्याचं काम तुमच्याही नकळत केलं जातं . याला माणसं घडवणं म्हणावं की अजून काही ? अगदी स्वतःला पाहीजे तशी माणसं घडवली जातात . हा साचा म्हणजे विचारसरणी . या साच्यामध्ये बसायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं . कुठं झुकायचं आणि कुठं नाही हा सुद्धा तुम्हीच सोडवायचा प्रश्न . स्वतःची मत , तत्व नसतील तर गपगुमानं तुम्हाला या साच्यात अॅडजस्ट व्हावं लागतं नाहीतर तुम्हाला बाहेरचा रस्ता पकडण्याची मुभा असतेयंच . तुम्हाला काही बोलण्याची / करण्याची / बदलण्याची संधी मिळेलंच असं नाही .
पण तरीही एक पर्याय इथून-तिथून खुला असतोय..
तो साचाच तोडण्याचा..
तसा प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही असं मला तरी वाटतंय..

" मुक्काम पोस्ट कोसला !! "

ज्या दिवशी कोसला संपलं त्या दिवशी एकच वाटलं की आपण लय म्हणजे लय म्हणजे लय मुर्ख आहोत . जगातल्या सगळ्या फालतू प्रश्नांना कवटाळून जगतोय . अन ठरवून टाकलं आता पाहिजे तसं जगायचं ! दुनिया गेली ..

कोसला मध्ये असं काहीतरी आहे की जे शब्दांत पकडता येत नाही. अदृश्य असा कैफ चढतो की नंतर सगळंच शून्य वाटायला लागतं. आजवर वाचलं ते कोसला पुढं काहीच नाही आणि इथून पुढे जे वाचलं जाईल ते पण कोसला च्या तोडीच्या अपेक्षेने !

कोसला वाचल्यानंतर समाधान मिळण्याऐवजी अस्वस्थता वाढलीय. मेंदू अजून काहीतरी शोधतोय किंवा मेंदूच्या अपेक्षा अजून वाढल्यात. कोसलाने डोक्याचं वारूळ केलं आणि प्रश्नांच्या मुंग्या सोडल्या .

कोसला प्रत्येक मध्यम वर्गीय मनाचं आणि पांडुरंग प्रत्येक मध्यम वर्गीय तरूणाचं प्रतिनिधित्व करतोय असं वाटलं..

- मुक्काम पोस्ट
कोसला
अविधा
१७ मे २०१५

..पुलं आणखी कोण !!

पुलं ची पुस्तकं म्हणजे नदीच तुडूंब भरलेलं पात्रं . डुबकी मारावी .. पाण्याने सर्वांगाला स्पर्श करावा तसा त्यांचा प्रत्येक शब्द मनाला फक्त स्पर्शच करत नाही तर गुदगुल्याही . आपण वाचत जातो तसे त्यांचे शब्द काठाला हळूवार धक्का देणार्या पाण्यासारखे स्पर्श करतात.. ती हलकीशी छोटी लाट येते.. आेसरते .. लाटेखालच्या लाटेलाही गोंजारते .. त्यांची पुस्तकं वाचून आरामात बाजूला ठेवता येतात आणि आपल्या कामाला लागतं येतं . डोकं शांत-शांत होतं . घरात वरती कुठेतरी आढ्याला कापडात नारळ बांधलेला असतो . त्याच्याप्रती एक श्रद्धा असते . आधार असतो तशी पुलं ची पुस्तकं . प्रत्येक घरातल्या आयुष्यांचा प्रत्येक पदर उलगडणारी !!

.. अग्रलेख !

" राजकारणावर लिहिता का ? "
" नाही "
" तुम्हाला लगेच अग्रलेखच लिहायचे असतात !"
" .... "
"हलकं फुलकं ?"
"हो"
"ते आमच्याकडे खूप आहे."
" .... "

Thursday 13 August 2015

.. माणसाव्यतिरिक्त !

माणूस सोडून अजून काय-काय होता येईल आणि कुठे-कुठे जन्म घेता येईल असा सहज विचार केला.. आणि ........
ध्रुवावर !
पेंग्विन बनायचं !
बर्फच बर्फ !
सगळ्या बर्फात गडगड लोळणार !
त्यानंतर मासा !
देवमासा !
समुद्रातला ! ( समुद्रातच असतोय नाही का..
अजून...
डॉल्फिन !
पण मी लोकांना पाण्यात अजिबात उड्या मारून दाखवणार नाही !
त्यानंतर प्रचंड खडबडीत खोड असलेलं झाड..
पण जंगलातलं.. नाहीतर बाहेर करमणार नाही.
किंवा
एखादा रंगीत पक्षी ..
पण एकदम नवीन प्रकारचा..
सध्यातरी इतकंच ..
पण तुम्ही कुठं असणार त्यावेळी ?

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...