Saturday 26 September 2015

रानडे ..

आज खूप दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा योग आला .. आजपण ते तितकंच शांत वाटलं .. कदाचीत ती मनाची अवस्था असेल .. तिथं गेल्यानंतर तसं शांत वाटलं असेल .. गेटच्या आत इथलं जगच वेगळं आहे .. खासकरून तिथली झाडं .. तिथली शांतता ..

गेटमधून आत एण्ट्री करताना जर पाला पडला असेल तर तो तुडवत पुढे जाताना आपण कोणीतरी स्पेशल आहोत असं वाटतं .. गेट ते पहिली पायरी स्वतःच्या नादात एकदम निवांत चालायचं .. मस्त वाटतं ..

आजपण आठवण आली की हुरहूर वाटतेच .. तिकडे जाणं टाळते खरंतर .. गेलं की लायब्ररी कडे जावंसं वाटतं .. त्यातल्या १६ नंबर च्या कपाटासमोर उभं राहावंसं .. त्याच्या धूसर काचेत स्वतः चं प्रतिबिंब शोधावंसं वाटतं .. प्रत्येक ठिकाणी अस्तित्वाचा एक भाग सोडून आल्यासारखं आहे काहीतरी ..

थोरले बंधु आणि मी आलो होतो तो पहिला दिवस आजही तसाच आठवला .. हे ठिकाण समृद्ध बनवतं हे विशेष .. इथल्या वातावरणात बदलवण्याची ताकद आहे !

असं वाटतं ते कट्टे पण बोलतात ..येता - जाता थांबा म्हणतात .. त्या खुर्च्या कायम पोरांच्या प्रतिक्षेत असतात .. आहेत .. खरंतर पोरं आहेत म्हणून ते ही जिवंत आहे ..

Monday 7 September 2015

बाकी काही नाही ..

काही लोकं लवकर भेटतात .. काही उशीरा .. काही जाता - जाता ..
यातील कोणासाठीही वेळ देणं म्हणजे ..
भविष्यातील दुःखाला निमंत्रण !
प्रत्येकजण चुटपुट लावून जातो ..
बाकी काही नाही ..

Sunday 6 September 2015

.. आणि मला आवाजात बोलायचंय

स्वतःच्याच कानावर हात ठेवून स्वतः चा आवाज एेकण्यात मज्जा असते . लहानपणी ही करामत खूप वेळा केली .
फोनवर बोलताना पण कधीकधी आपलाच आवाज आपल्याला एेकू येतो . स्वतः चा आवाज एेकण्यात पण गंमत वाटते .
पण आता कोणीच कोणालाच जास्त फोन करत नाही . फक्त मॅसेज .
कोणाशी जास्त बोलायची गरज पडत नाही . मॅसेज मध्येच बोलायचं , हसायचं , रागवायचं , रडायचं ..
सगळेच आणि सगळंच आॅनलाईन ..
तरी बरं आहे, आईकडे वाॅटसअॅप नाही ..
एकूण काय ,
वॉटस अॅप आणि फेसबुक आवाज दाबून टाकत आहे .
.. आणि मला आवाजात बोलायचंय .

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...