Posts

Showing posts from November, 2026

पहाटेच्या वाटेवर...

.. हिवाळ्यात येतेच लवकर जाग. जशी सुट्टीच्या दिवशी येते. याचं काही नाही करू शकत. रात्र सोडून गेली असली तरी वाटतं की सकाळ अजून खूप लांब आहे. तरीही झोप न येता डोळे टक्क उघडेच राहतात. मग काय, चालायला जायचं. चालायला गेलं की चांगली तंद्री लागते. अशी तंद्री की सगळं शून्यवत होतं. चालताना तरीही आधी काय दिसतं... झाडांच्या फांद्यांमध्ये लपलेले दिवे साडेसहापर्यंत जळत असतात. मग मिटून जातात. झाडात तयार झालेला हा उजेडाचा प्रदेश थेट भूतकाळात जातो. या उजेडाची स्वतःची वेगळी गोष्ट आहे. जो पाहील, ती त्याला तशी दिसते. पूर्व दिशेकडे, उजव्या हाताला, एकच लख्ख चांदणी राहते आणि डोक्यावर तीन. एक गडद आणि दोन फिकट. पर्मनंट आहेत. त्याच दिसतात. आता उजवीकडं. नुकतीच दिवाळी झालीय... म्हणजे आता तुळशीचं लग्न. हौशी घरांच्या गॅलरीतल्या झाडांवर अजूनही माळा खेळत आहेत. हिरव्या, लाल आणि निळ्या. याचं रेटिंग ५ पैकी ५ असू शकतं. सगळीकडे सगळ्यात आधी कोण उठत असेल? कावळा. कावळ्याला पण लवकर भूक लागते का... बाकीचे धोरणी पक्षी कुठेतरी शांतपणे निघतात. काही कुटुंबवत्सल घरट्यांभोवती घिरट्या मारतात. पक्ष्यांची शिस्त चांगली. चांदीपाटाच्या एक...