..आम्हाला अधिकार नसतोच मुळी..मशाली पेटल्या तरी त्या विझवून टाकायच्या असतात..कधीतरीच प्रेरित होणारे असतो आम्ही..कायमस्वरूपी प्रेरित व्हावं..राहावं.. अस वातावरण भोवती नसतच मुळी.. दिवसेंदिवस आमच्यातला शिवबा.. कर्ण..कृष्ण..दाभोळकर.. पानसरे विचार मारला जातच असतो.चुकून जागा झालेला माणूस पुन्हा झोपवला जातो.. झोपला नाहीच तर थेट यमसदनाला धाडला जातो.संतापाच्या लाटा.. त्वेषाच्या ठिणग्या.. अपमानाची वादळे सारे पुनः पुन्हा शरीरातच दाबून टाकावे लागते.सगळी फक्त घुसळण असते.. वैचारीक.. शरिरिक .. फेकलं जाणं असतं इकडून तिकडे.. जिथे पडू तिथं उकिरडा असला तरी पुन्हा नव्याने उठून मुर्दाडासारखं जगणं आम्हाला मान्य होऊ लागलेलं असतं..आम्ही विसरत चाललेलो असतो स्वतःच माणूसपण..मारण किवा मरण या दोनच गोष्टी जगण्यासाठीच्या कसोट्या बनू लागतात.या दोन गटात आम्ही कधी विभागले जातो आम्हाला कळत पण नाही.एक तर मारा नाहीतर मरा! मग ती तत्व असोत..फार जीवापाड जपलेली मुल्य असोत किवा तुमचा धर्म, जात, संस्कृती, परंपरा यातलं काहीही…हे अपवाद ठरूच शकत नाही.. हळूहळू या सगळ्यातून मानव पशूंची नवी पिढी जन्माला येते.. वैचारिक मूल्य हरवलेली..पूर्णतः अस्थिर..जगा आणि जगू द्या ऐवजी मारा आणि मरू द्या! या तत्वाने जगणारी..यांच्यासाठी इतिहास नावापुरता असतो..भूगोलाची तोडमोड केलेली असते..एवढ्यातूनही चुकून एखाद्याचं समाजभान जागृत झालं आणि जमलंच तर एखादा कधीतरी शिवबा..कधीतरी मावळा..कधीतरी कर्ण आणि कधीतरी माणूस बनतो..बाकी उरलेले सर्व जिवंत प्रेतेच असतात...
…खरं तर जोडलेल्या असतात या वाटा कुठंतरी एकमेकांशी.. गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची.. एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील.. आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा.. पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..?
Friday, 20 February 2015
Subscribe to:
Comments (Atom)
बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!
‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...
-
‘ एका कोळीयाने ’ ही कादंबरी म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘ द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. सुप्रसिद्ध...
-
सहज आठवत होते... वेळी-अवेळी पाण्याच्या टँकरचा आवाज आला की उठायचो. तेवढं वर्ष जास्तच तापदायक गेलं. पण सवय झालेली. याच्यापेक्षा जास्तीत जास्त...