Skip to main content

Posts

फेणे!

...दहावीची बोर्डाची परिक्षा सुरू होती आणि वस्तीवर कुणीतरी फेणे आणला होता. रात्री मी अभ्यास करताना जोडीला भाऊही चादरीत लपवून काहीतरी वाचत होता. काय आहे म्हणून बघितलं तर फास्टर फेणे! 'तुझी परिक्षा आहे तू अभ्यास कर' म्हणत त्याने पुस्तकाला हातही लावून दिला नव्हता. 'निदान चित्र तरी दाखव त्यातली' म्हणून गयावया केलं. तेव्हा पाहिलेलं फेणेचं चित्रंं आजही आठवतंय. ते पाहात असताना 'आता आपल्याला हे पुस्तक कधी वाचायला मिळणार?' या विचारानं खूप अस्वस्थ वाटलं होतं.  तो क्षण आणि फेणे तेव्हापासून लक्षातंय. गुगलवर पुस्तकं शोधत असताना कायम या पुस्तकांची कव्हरं पाहून मनाचं समाधान करून घ्यायचे. कधीतरी आख्खाच्या आख्खा संच विकत घ्यायचा ठरवलं होतं. पण अगदी रानडेला गेल्यावरही कधी उत्कर्षला जाणं झालं तरी आणि एरवीही कुठल्या दुकानात जाऊन विकत घ्यायची हिंमत कधीच झाली नाही. पुण्यात संमेलन लागलं आणि तिथे पुन्हा फेणे दिसला. पहिल्या दिवशी पाहूनच मनाचं समाधान करून घेतलं. पण दुसर्या दिवशी पुन्हा ती पुस्तकं इतक्या जवळ असूनही आपण घेऊ शकत नाहीये या विचारानं अजूनच कसंतरी वाटायला लागलं. शेवटी मनाची हिंम...

आमचं गावच साताराय...

स्वारगेटला असे बरेच वयस्कर लोक भेटतात. ज्यांना गावाकडनं एसटीत बसवून दिलेलं असतं. स्वारगेटला उतरलं की पुढं त्यांचं त्यांनी बघायचं. एखादा नोकीया आणि कागदाच्या चिटूर्या...

निघालेली माणसं... निघालेला प्रवास...

ते गाणं आठवतंय का? ज्यात सगळे लोक निघालेले असतात. हातात, डोक्यावर सामान घेऊन... आपला सनी देओलपण ट्रकमधून अमिशा पटेलला सोडायला निघालेला असतो. प्रसंग फाळणीचा आहे. सगळीकडं भगभ...

'बी'च किडकं

रायबोराचं झाड होतं समोरच्या शेतात. दरवर्षी बोरं लागायची; पण किडकी. प्रत्येकच बोर किडकं निघायचं. त्या झाडासाठी बरंच काही केलं असं आक्का सांगायची. तरीपण काहीच फरक पडला नाही. बांधावर होती म्हणून की काय पण ती बोर तोडूनही टाकली नव्हती. त्या झाडाच्या थोडं अलीकडं लिंबाचं झाड होतं. त्याच्या लिंबोळ्या गोळा करायचा नाद लागला होता. लिंबोळ्या गोळा करताना बघून आक्का म्हणायची खाशील बिशील. विशारी असतं ते. आक्कानं असं म्हटल्यावर मी त्या गोळा केलेल्या लिंबोळ्या तिथंच टाकून देत असे. गंमत म्हणज त्यातलीे एकपण लिंबोळी किडकी नसायची. डोक्यातून जाता जायची न्हाई ही गोष्ट. माझी समजूत काढायला की काय आक्का म्हणलेली बीच किडकं असल त्या बोरीच म्हणून सगळी बोरं किडत्यात. किडकं बी किडकी बोर. बीच किडकं तर आपण आता काय दुरूस्त करणार असा विचार मनात येऊन अस्वस्थ वाटायचं. आज ती बोर आहे नाही काही माहिती नाही. पण वट्यात गोळ्या केलेल्या लिंबोळ्या आठवतात. बोटात धरून सगळ्या बाजूनं तपासून पाहिलेलं रायबोरही आठवतं. अन बीच किडकं हेही पाठ सोडत नाय. बेसिक गोष्टीतच गोंधळ असला की सगळं गणितच हालतं. बेसिक गोष्ट करप्ट असू नय. बाकी आशावाद ...

रुखरुख...

कदाचित वर्षानंतर बुकगंगामध्ये गेले असेन. हवं ते पुस्तक सापडेना तेव्हा पुस्तकं शोधण्याचा सराव मोडला की काय असंच वाटलं. तेही तिथं नव्हतं म्हणा. पुस्तकाची दुकानं शांत करतात असा समज; पण आज असं झालं नाही. पूर्वी कधीतरी हवी असणारी दोन पुस्तकं मिळाली. आता पेला अर्धा भरलेलाय. पण तरीही... आवडत्या ठिकाणांनी नाराज केलं की रुखरुख लागतेच आणि ती रुखरुख अजूनही आहे... बाकी तिथं लोकांचं येणंजाणं बरंच वाढलंय. बरं वाटलं... रानडे सुटता सुटता त्याच रस्त्यावर हे सापडलेलं... म्हणून कदाचित...

अवस्था

..भेटतात ती माणसं असतातच कुठं! भेटतात त्या अवस्था. परस्परपूरक... टोकाच्या... अगदी समांतर अशा.. साचण्याची अवस्था मिळाली की पाणी थांबतंं.. तसंच असतं आपलंही थांबणं आणि उतार भेटला की खळखळत वाहणं..  वाहतं पाणी अडतंच कुठेतरी.. आता परीक्षा असते त्या जागेची जिथे ते अडणार असतं.. कधीकधी ते नुसतं अडत नाही . तिथे ते हळूहळू मुरतंसुद्धा. ते त्यानं ठरवलेलं नसतं तरीही. कारण त्या जमिनीचा, त्या जागेचाही गुणधर्म असतोच की काही.. काही ठिकाणी नुसतं गोल फिरून वळसा घालून निघून जातं पाणी..  अर्थात प्रत्येक जमिनीत पाणी मुरतंच असं नाही. तो तिचा गुणधर्म झाला. तोही चुकीचा नाही. मुळात इथं सगळंच स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे कार्यरत राहतं.. यातलं काही काही चुकीचं नसतं..  एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं असतं फक्त. त्रागा करून चालत नाही. थोडक्यात सामावून घेणारी अवस्था मिळेपर्यंत वाहत राहायचं असतं.. बाकी काय ..

सबको जाना है एक दिन!

"भैय्या रेसकोर्स तक छोडेगे क्या?" म्हणत ती रिक्षाजवळ येऊन थांबली. रिक्षावाला "हो" म्हणाला. त्यावर तिने पुन्हा सभ्यपणे "बैठू क्या?" विचारलं. रिक्षावाल्यानं फक्त मान हलवली. ते "...