Tuesday 9 June 2015

शिवाजी कोण होता?

शिवाजी राजांचं चरित्र आणि ही चरित्र कशी आत्मसात केली गेली..रूजवली गेली याची चिकित्सा यात नक्कीच फरक आहे.मुख्य मुद्दा असा, शिवाजी राजांबद्दल सगळेच लहानपणापासून वाचत आलोय तर मग पुन्हा ' शिवाजी कोण होता?' वाचण्यात काय हशील?

एखादी संकल्पना तिच्या मूळ रूपात जशीच्या तशी पुढे हस्तांतरीत होत असेल तर चांगलच.ही संकल्पना, त्यासंबंधाने जोडून येणारी इतर माहिती, घटना, व्यक्ती, त्यांचे विचार, तत्वं यांची आपल्या दैनंदिन व्यवहारांशी योग्यरितीने सांगड घालणं ही तितकच महत्त्वाचं..पण याच विचारांत जर कुणी जाणीवपूर्वक बदल करत असेल की जो समस्त जनांसाठी अहितकारी ठरणार असेल तर याला वेळीच आवर घालणंही तितकच गरजेचं असतं! शिवाजी राजे ही असाच एक विचार आहेत! पिढ्यानपिढ्या चालत आलेला..तो विचार आत्मोन्नती, समाजोन्नती आणि देशोन्नती कडेच घेऊन जाणारा आहे. परंतु आता तो त्यांच्या मूळ स्वरूपात आहे का याची चिकित्सा म्हणजेच, "शिवाजी कोण होता" हे पुस्तक!

सद्यस्थितीला जनताजनार्दनाची अडचण अशी की धर्म ही आता त्यांची दुखरी नस आहे. त्यामुळे जनमनातील धर्म दुखावेल असं काही झालं की धर्मवेडे धर्मयुद्ध छेडू पाहतात. पण त्यावेळी फक्त बदला अपेक्षित असतो. पण अशाने कुणाचाही धर्म मोठा किंवा लहान होत नाही.धर्माचं लेबल लावलेला मात्र जिवानिशी जातो. फक्त वर्चस्वाची भावना असते जी धर्मांध बनवते. यामगील एक कारण सांगता येईल की चुकीच्या गोष्टीचं उद्दातीकरण! आणि हे अपुऱ्या माहीतीच्या आधारे केलेलं असतं.हे उद्दातीकरण रास्त ठरवण्यासाठी मूळ संकल्पना माहित असणं गरजेचं. शेवटी ज्याचा विवेक जागा आहे, जो सारासार विचार करू शकतो तो नक्कीच आंधळेपणाने कोणतीही कृती करणार नाही आणि असं काही करणार्यांना पाठीशी ही घालणार नाही.

कुणाचेही आंधळे अनुयायी बनण्यापेक्षा स्वतःच्या मेंदूवर काही गोष्टी घासून पाहिल्या तर योग्य अयोग्य विचारातली तफावत लक्षात येतेच! तसंही ज्या शाळांनी इतिहास शिकवला त्यांनीच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा हे ही सांगितलं होतच की..शेवटी सत्य हे शाश्वत आणि चिरकाल टिकणारं असतं! कशाचाही अतिरेक हा विनाशीच असतो शेवटी..

राजांना हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून स्वीकारण्यापेक्षा एक उद्दात विचार म्हणून स्वीकारलं तर बरेचसे प्रश्न सुटतील अशी आशा वाटते..आणि हा विचार मूळ स्वरूपातच आपल्यात रूजावा म्हणून 'शिवाजी कोण होता?' हे कॉ. गोविंद पानसरे लिखित पुस्तक प्रत्येकाने एकदातरी वाचावे!

No comments:

Post a Comment

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...