झाडं आवडतात

झाडं आवडतात. 

शहाणी, समजदार वाटतात. 

माणसाचेच कुठलेतरी 

नातेवाईक असल्यासारखी. 


झाडांवर पडलेलं चकाकतं ऊन पाहिलं 

की सगळं विसरायला होतं. 

स्थळ, काळ, वेळ 

काहीही आठवत नाही.


पण आजकाल प्रश्न पडतो. 

की झाडं पण 

दुःखी होत असतील का?

जवळची झाडं निघून गेल्यावर... 


आणि इथून निघून गेलेली माणसं 

कुठं गेली 

हे कदाचित

झाडांनाच ठाऊक असेल.


कधीकधी ही झाडंच

निघून गेलेल्या माणसांचा

उरलेला अंश वाटतात...


अखेरपर्यंत झाडंच

त्या दोन्ही माणसांवर

सावली धरत राहतात. 


#झाडं_आहेत_तोपर्यंत...

Comments

Popular posts from this blog

फेणे!

कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं...

माणसाला ठार करता येईल; पण त्याची हार नाही करता येणार...