फेणे!
...दहावीची बोर्डाची परिक्षा सुरू होती आणि वस्तीवर कुणीतरी फेणे आणला होता. रात्री मी अभ्यास करताना जोडीला भाऊही चादरीत लपवून काहीतरी वाचत होता. काय आहे म्हणून बघितलं तर फास्टर फेणे! 'तुझी परिक्षा आहे तू अभ्यास कर' म्हणत त्याने पुस्तकाला हातही लावून दिला नव्हता. 'निदान चित्र तरी दाखव त्यातली' म्हणून गयावया केलं. तेव्हा पाहिलेलं फेणेचं चित्रंं आजही आठवतंय. ते पाहात असताना 'आता आपल्याला हे पुस्तक कधी वाचायला मिळणार?' या विचारानं खूप अस्वस्थ वाटलं होतं. तो क्षण आणि फेणे तेव्हापासून लक्षातंय. गुगलवर पुस्तकं शोधत असताना कायम या पुस्तकांची कव्हरं पाहून मनाचं समाधान करून घ्यायचे. कधीतरी आख्खाच्या आख्खा संच विकत घ्यायचा ठरवलं होतं. पण अगदी रानडेला गेल्यावरही कधी उत्कर्षला जाणं झालं तरी आणि एरवीही कुठल्या दुकानात जाऊन विकत घ्यायची हिंमत कधीच झाली नाही. पुण्यात संमेलन लागलं आणि तिथे पुन्हा फेणे दिसला. पहिल्या दिवशी पाहूनच मनाचं समाधान करून घेतलं. पण दुसर्या दिवशी पुन्हा ती पुस्तकं इतक्या जवळ असूनही आपण घेऊ शकत नाहीये या विचारानं अजूनच कसंतरी वाटायला लागलं. शेवटी मनाची हिंम...

Comments
Post a Comment