थोडीशी माती, छोटासा पक्षी अन् एखादं झाड
![]() |
...भाजलेल्या शेंगांचा वास, तिने सोबत आणलेल्या काळ्याभोर मातीसहीत हवेत मिसळला तरी ओळख लागते. झाडाच्या फांद्यामध्ये दडलेला पक्षी ओरडला की कान टवकारतातच. पाऊस दरवर्षी आला तरी आयुष्यभर मनात रुतून बसलेले सगळे ऋतू आठवतात.
...माणसाला ओळखणारं हे सगळं असतं. आपल्याही हृदयात थोडीशी माती, छोटासा पक्षी अन् एखादं झाड असतंच जणू. माणसं विसरतात पण ऋतू विसरत नाहीत.
माणसाला जगायला हे जास्त लागतं.
बाकी जगण्याची अतीव ओढ कशातच नसते...

Comments
Post a Comment