Posts

काही वाचनीय Blogs..

सीमोल्लंघन http:// simollanghan.blogspot.com / वैश्विक http:// vaishwik.blogspot.com / रेघ http:// ekregh.blogspot.com / kumar ketkar http:// kumarketkar.blogspot.com / वाचू आनंदे!! http:// vachuanande.blogspot.com / इतिहासात..या दिवशी.. http:// itihasatyadivshi.blogspot.com / कानगोष्टी http:// kangoshti.blogspot.com / चिन्ह http:// chinhatheartblog.blogspot.com / पुस्तके नवी-जुनी... http:// muktvachan.blogspot.com / अभिजात http:// nandini - atmasiddha.blogspot.com / KUHOO कुहू http:...

शिवाजी कोण होता?

शिवाजी राजांचं चरित्र आणि ही चरित्र कशी आत्मसात केली गेली..रूजवली गेली याची चिकित्सा यात नक्कीच फरक आहे.मुख्य मुद्दा असा, शिवाजी राजांबद्दल सगळेच लहानपणापासून वाचत आलो...

आजवरचा वाचन प्रवास..

माझे शंभर एक.. १ चौघीजणी - शांता शेळके २ फसलेला क्षण - वि. स. वाळिंबे ३ वेताळकोठी - ४ डार्करूम - बाबा कदम ५ राही - बाबा कदम ६ कोमा - डॉ. रॉबिन कुक ७ शापित सौंदर्य - जनार्दन कदम ८ उपरा - लक्...

तोत्तोचान

खरंतर तोत्तोचानबद्दल लिहीण्यासारखं खूप आहे...एक अत्यंत खोडकर, जिज्ञासू, अति उत्साही अशा छोट्या जपानी मुलीची ही कथा..सतत शाळेच्या खिडकीत उभी राहणारी..खिडकीतून रस्त्यावर...

म्हैसाळ: दलित मुक्तीचा एक प्रयोग

        म्हैसाळ कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं मिरजंजवळील एक गाव.इथेच मधुकर देवल यांनी दुधपुरवठा सोसायटी आणि संयुक्त सहकारी शेती सोसायटीचे प्रकल्प राबविले.हे प्रकल्प ...

..आम्ही जिवंत प्रेतेच असतो!!

                ..आम्हाला अधिकार नसतोच मुळी..मशाली पेटल्या तरी त्या विझवून टाकायच्या असतात..कधीतरीच प्रेरित होणारे असतो आम्ही..कायमस्वरूपी प्रेरित व्हावं..राहावं.. अस वातावरण भोवती नसतच मुळी.. दिवसेंदिवस आमच्यातला शिवबा.. कर्ण..कृष्ण..दाभोळकर.. पानसरे विचार मारला जातच असतो.चुकून जागा झालेला माणूस पुन्हा झोपवला जातो.. झोपला नाहीच तर थेट यमसदनाला धाडला जातो.संतापाच्या लाटा.. त्वेषाच्या ठिणग्या.. अपमानाची वादळे सारे पुनः पुन्हा शरीरातच दाबून टाकावे लागते.सगळी फक्त घुसळण असते.. वैचारीक.. शरिरिक .. फेकलं जाणं असतं इकडून तिकडे.. जिथे पडू तिथं उकिरडा असला तरी पुन्हा नव्याने उठून मुर्दाडासारखं जगणं आम्हाला मान्य होऊ लागलेलं असतं..आम्ही विसरत चाललेलो असतो स्वतःच माणूसपण..मारण किवा मरण या दोनच गोष्टी जगण्यासाठीच्या कसोट्या बनू लागतात.या दोन गटात आम्ही कधी विभागले जातो आम्हाला कळत पण नाही.एक तर मारा नाहीतर मरा! मग ती तत्व असोत..फार जीवापाड जपलेली मुल्य असोत किवा तुमचा धर्म, जात, संस्कृती, परंपरा यातलं काहीही…हे अपवाद ठरूच शकत नाही.. हळूहळू या सगळ्यातून मान...

बेरड'

नुकतंच 'भीमराव गस्ती' यांचं 'बेरड' हे आत्मकथन वाचनात आलं.पुस्तक वाचताना राहून-राहून असं वाटत होत कि फार उशीराच हे पुस्तक हातात पडलं..या अगोदरच हे पुस्तक वाचनात यायला पाहिजे होत.सामाजिक क्षेत्रात कार्य कराव कि नोकरी करून आपला धर्म सांभाळावा अशी द्विधा मनस्थिती असणाऱ्यांसाठी हे आत्मकथन नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतं!तसेच समाजहितासाठी नव्याने संघटना बांधू पाहणाऱ्या,चळवळ उभी करू पाहणाऱ्या सळसळत्या रक्ताच्या तरुणाईला एक दिशा देण्याचं कामही चोखपणे बजावतं. अजून एका कारणासाठी या पुस्तकाचा उल्लेख महत्वाचा ठरतो..कालच्याच वर्तमानपत्रात (लोकसत्ता,११ सप्टेंबर २०१४)पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातल्या 'देवदासी' प्रथेविषयी बातमी आली होती.गस्तींच्या' आत्मकथनात हि या प्रथेचा माहितीवजा उल्लेख आहे.खरंतर पुस्तक लिहून आता बरीच वर्ष उलटलीत..पण देवदासी प्रथेच स्वरूप,ठिकाण,प्रमाण यात कसलाही बदल नाही.इतक्या वर्षांनंतरही ही प्रथा अजून सुरूच आहे..महाराष्ट्र शासनाने ही प्रथा नष्ट व्हावी म्हणून कायदाही केला आहे.पण लाभार्थी लाखो संख्येने असताना काही हजार देवदासीनाच अनुदानाचा लाभ मिळत...