रानडे ..
आज खूप दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा योग आला .. आजपण ते तितकंच शांत वाटलं .. कदाचीत ती मनाची अवस्था असेल .. तिथं गेल्यानंतर तसं शांत वाटलं असेल .. गेटच्या आत इथलं जगच वेगळं आहे .. खासकरून तिथली झाडं .. तिथली शांतता ..
गेटमधून आत एण्ट्री करताना जर पाला पडला असेल तर तो तुडवत पुढे जाताना आपण कोणीतरी स्पेशल आहोत असं वाटतं .. गेट ते पहिली पायरी स्वतःच्या नादात एकदम निवांत चालायचं .. मस्त वाटतं ..
आजपण आठवण आली की हुरहूर वाटतेच .. तिकडे जाणं टाळते खरंतर .. गेलं की लायब्ररी कडे जावंसं वाटतं .. त्यातल्या १६ नंबर च्या कपाटासमोर उभं राहावंसं .. त्याच्या धूसर काचेत स्वतः चं प्रतिबिंब शोधावंसं वाटतं .. प्रत्येक ठिकाणी अस्तित्वाचा एक भाग सोडून आल्यासारखं आहे काहीतरी ..
थोरले बंधु आणि मी आलो होतो तो पहिला दिवस आजही तसाच आठवला .. हे ठिकाण समृद्ध बनवतं हे विशेष .. इथल्या वातावरणात बदलवण्याची ताकद आहे !
असं वाटतं ते कट्टे पण बोलतात ..येता - जाता थांबा म्हणतात .. त्या खुर्च्या कायम पोरांच्या प्रतिक्षेत असतात .. आहेत .. खरंतर पोरं आहेत म्हणून ते ही जिवंत आहे ..
Comments
Post a Comment