..आवराआवरी होते. पोती, माणसं भराभर ट्रकात टेम्पोत बसतात. पोटभर खाऊन झालेलं असतं. आता घरची आेढ लागते. हिकडं फोटोसेशन सुरू असतं तवर तिकडं मंडप उतरवायला चालू झालेले. ह्याचं खाऊन झालेलं नसतं तवर त्यांच स्टेज काडायला बी सुरुवात झालेली असते. उगं मागं रेंगाळलेली पै-पावणी पण कणच्या गाडीत बसायचं याचा इचार करत असत्यात. कुठल्यातरी म्हातारीला कधी नव्हं ते महत्व आलेलं असतं की पुनःपुन्हा तिचं पाय धरणं चालू असतं." येऊ का आक्का" म्हणून कोणी दुरदेशीचा भाऊ निरोप घेऊन निघतो. ह्यांची रडारडी आपापल्या गणगोतात सुरू असते.
आन ते दोघं..
कुठल्या अनोळखी माणसाबर, माणसावर विश्वास ठेवून तिची-त्याची गाठ असते. तिचं चालणं, त्याचं वागणं समदंच बदलणार असतं. बाप जन्मात आपण कधी त्यांना पाह्यला पण जाणार नसतो .रित-भात नावाची गोष्ट पुन्हा अजरामर होते. तिची खुंटी त्याच्या पडवीत ठोकली जाते. त्याचाही गळाबंद हाताखाली येतो. सगळं मान्यमान्य असतं!आन आमच्या सारखी चुकार पाखरं मांडवात काहीतरी हरवून बसलेली असतात. कधी ती माळ असते कधी रूमाल तर कधी...
आता हातावरची मेंदी अधिक गडद असते. परवाच्या घाण्याच्या बांगड्या उद्या शाळेत चालणार नसतात. त्याचे ही किंचीतसे दुःख असते. ' इक एेसी लडकी थी' चा बॅंड घरी गेलेला असतो. हा, पत्रावळीत जास्त बुंदी वाढणारा चेहरा मात्र लक्षात राहतो. नंतर कळतं, तो त्याच्या मित्राचा, मित्राचा, मित्र (म्हणजेच काहीही कामाचा नसतो ) असतो! विशेष हे की पुढच्या मुहूर्तातलं पण सगळं असंच असतं. बाकी डोळ्यापुढं समदीकडं मांडवभर पसरलेली गजर्यातली मुकी मुकी फुलं आन डोक्यात आक्षदा नावाचे रंगीबेरंगी तांदूळ असतात........................
( निमित्त- जवळच्या मित्राचं लग्न ठरलंय! शुभेच्छा रे! )
…खरं तर जोडलेल्या असतात या वाटा कुठंतरी एकमेकांशी.. गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची.. एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील.. आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा.. पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..?
Thursday, 8 September 2016
शुभमंगल....!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!
‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...
-
ते गाणं आठवतंय का? ज्यात सगळे लोक निघालेले असतात. हातात, डोक्यावर सामान घेऊन... आपला सनी देओलपण ट्रकमधून अमिशा पटेलला सोडायला निघालेला असतो....
-
कधी कधी हे ह्रद्य 'नदीत' बदलल्याचा भास होतो तर कधी 'समुद्रात'.. समुद्राच्या पाण्यासारखी त्यात भरती येते .. आेहोटी येते .. ला...
No comments:
Post a Comment