Posts

आणखी एक दुपार...

ऐन पावसाळा संपता संपता दुष्काळाच्या जाणिवा पसरत राहतात. भरीत भर गावाकडच्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर नव्वदीच्या पिढीला माहिती असलेले, जुन्या जाणत्यांचे फोटो अधूनमधून दिसतात. भर दुपारी ऑफिसात बसून डबा खाताना या सगळ्याची गोळाबेरीज होते आणि पोटात कालवतं. आपल्याला माहिती असलेलं, आपल्या डोळ्यांसमोरचं हळूहळू सुटत चालल्याची जाणीव जीवघेणी असते. सगळं आलबेल नाही हे कळलंच नाही तर किती बरं झालं असतं, असं वाटत राहतं. जीव कुठेच रमत नाही. आपण काय काय दुरुस्त करणार? आपल्या झेपेच्या पलीकडचं किती काही घडत असतं आणि तरीही त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवता येत नाही. बाकी, दुपारच्या जेवणाची वेळच वाईट. अती विचार करायला भाग पाडते...

टोपी, बूट आणि डोकेदुखी

कधीतरीची गोष्ट. सकाळी बसमध्ये नेहमीप्रमाणे कुठेकुठे जाणाऱ्यांची गर्दी होती. पावसाळी, रोगट हवा. अशा हवेत डोकं सनकून दुखतंच. तसं ते आदल्या दिवसापासूनच दुखत होतं. मायग्रेनची कृपा. या डोकेदुखीच्या तंद्रीत असताना बसमध्ये आणखी काही प्रवासी आले. तिशीच्या आसपासचे असावेत. तब्येतीनं हडकुळे. पायात नवीन काळे बूट, हातात नवीन पिवळी गोल टोपी. शाळेचे दिवस आठवले. छान वाटलं. साधी पोरं होती. बांधकामावर चालली असावीत. त्यांच्या मुकादमाबद्दलही चांगलं वाटलं. पोरांना नवीन साहित्य दिलं आहे. त्यांनी ते घरापासूनच घातलं होतं. पिशवीत टाकून कामाच्या ठिकाणी गेल्यावर घालू, असा काही प्रकार नाही. हेही ठीक आहे. वेळ वाचतो. बाकी लक्षात यावा एवढा विरोधाभास त्या बुटात, टोपीत आणि त्या माणसांनी घातलेल्या कपड्यांत तयार झाला होता. तिकीट स्वारगेटचं. मेट्रोचे कामगार असावेत. बसच्या डाव्या बाजूला असलेल्या चौकोनी रिकाम्या जागेत मी काही करून जागा पकडते, तसेच तेही उजव्या बाजूच्या रिकाम्या जागेत उभे होते. आधी उभेच होते. नंतर खाली बसले. म्हणजे आधी त्यातला एक जण, मग दुसरा. असे सगळेच. दोन पायांवर बसलेले. आता ती चौकोनी जागा त्यांनी भरून गे...

थोडंसं ऊन

गावाचं वेड असं की कुणाचंही गाव आवडतं. लोणंदमधून जोशीवीर मार्गे भुईंज, वाई, महाबळेश्वरकडे जातानाही असंच एक गाव लागतं. गावाचं नाव माहिती नाही, पण सैनिकाचं गाव आहे. देखणं आहे. खूप मोठ्या झाडाभोवती उंचसा पार, हापशी आणि मंदिर. सैनिकाचं का म्हटलं ते कळालंच असेल. गावाच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेली वडाची झाडं. अगदी दूरपर्यंत... त्यांच्या पारंब्या रस्त्याच्या डोक्यावर अर्धगोलाकार आकारात कापलेल्या. त्यामुळं अजूनच देखणा झालेला रस्ता. पोरांच्या भाषेत खुष्कीचा मार्ग! या गावातून बाहेर पडलं की काही अंतरानंतर सगळी शेतंच सुरू होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला. दूरपर्यंत एकही घर नाही की फडफडता सदरा. इतकंच काय, अगदी त्या वावरातनं बुजगावणंही नाही! सडक एकदम अरुंद आणि एकटी. मागं-पुढं सडकंशिवाय कुणीच नाही. अगदी शेळ्या-मेंढ्या फिरून गेल्याचीही चिन्हं नाहीत. या अखंड एकट्या सडकंवर काही काळ उभं राहावंसं वाटतं. काय माहीत, पण कदाचित उन्हाच्या पाऱ्याची भुरळ असावी. वावरं स्वतःतच मग्न असल्यासारखी. डोक्यावर तुरळक भटके ढग... बाकी सगळं आकाशाचंच. एक सलग नजर टाकली तर वावरांच्या छटा बदललेल्या. कुठे काळ...

झाडं आवडतात

झाडं आवडतात.  शहाणी, समजदार वाटतात.  माणसाचेच कुठलेतरी  नातेवाईक असल्यासारखी.  झाडांवर पडलेलं चकाकतं ऊन पाहिलं  की सगळं विसरायला होतं.  स्थळ, काळ, वेळ  काहीही आठवत नाही. पण आजकाल प्रश्न पडतो.  की झाडं पण  दुःखी होत असतील का? जवळची झाडं निघून गेल्यावर...  आणि इथून निघून गेलेली माणसं  कुठं गेली  हे कदाचित झाडांनाच ठाऊक असेल. कधीकधी ही झाडंच निघून गेलेल्या माणसांचा उरलेला अंश वाटतात... अखेरपर्यंत झाडंच त्या दोन्ही माणसांवर सावली धरत राहतात.  #झाडं_आहेत_तोपर्यंत...

...ढग प्रेमळ असतात

Image
  ...ढग प्रेमळ असतात आणि झाडंसुद्धा. #झाडं_आहेत_तोपर्यंत #मुखई

थोडीशी माती, छोटासा पक्षी अन् एखादं झाड

Image
...भाजलेल्या शेंगांचा वास, तिने सोबत आणलेल्या काळ्याभोर मातीसहीत हवेत मिसळला तरी ओळख लागते. झाडाच्या फांद्यामध्ये दडलेला पक्षी ओरडला की कान टवकारतातच. पाऊस दरवर्षी आला तरी आयुष्यभर मनात रुतून बसलेले सगळे ऋतू आठवतात. ...माणसाला ओळखणारं हे सगळं असतं. आपल्याही हृदयात थोडीशी माती, छोटासा पक्षी अन् एखादं झाड असतंच जणू. माणसं विसरतात पण ऋतू विसरत नाहीत. माणसाला जगायला हे जास्त लागतं. बाकी जगण्याची अतीव ओढ कशातच नसते...   #वळीव_२०२६ #शिरोळ_सांगली #माती_झाड_आणि_पक्षी #झाडं_आहेत_तोपर्यंत  

आकाशातलं झाड

Image
... आणि मग चालता चालता "थांब" म्हणालेलं आकाशातलं झाड. #झाडं_आहेत_तोपर्यंत #आसले #वाई #सातारा  

देव सर्वांना बिझी ठेवो!

तो : काय चाललंय? मी : काही नाही. नेहमीचंच. तो : कुठं, ऑफिसमध्येय का आत्ता? मी : हो. तो : बिझी आहेस ना? मी : हो. तो : चांगलंय...... मी : का रे? तो : आरं, बिझी आहेस म्हणजे खुश आहेस! मी : हा... म्हणजे बिझी तर आहे... तो : ऐकून बरं वाटलं. अशीच बिझी राहा... मी : .................................. असा भर दुपारचा त्याचा फोन येतो कवातरी... “आरं, गुरांना खायला नाही. प्यायला पाणी नाही. तुमच्या वस्तीवर तर लय बेक्कार...” तो जे काही म्हणतो, ते चित्र स्पष्ट दिसतं. त्याला काय सांगावं, कळत नाही. “काय चाललंय?” हा प्रश्न तो जितक्या सहजगत्या विचारतो, तोच प्रश्न त्याला विचारताना खूप अवघडल्यासारखं वाटतं. पण तरीही तो मला आठवणीने ‘अशीच बिझी राहा!’ हे म्हणायला विसरत नाही. ‘बिझी राहा’!................... असा निरोप ऐकलाय कधी? मी पहिल्यांदाच ऐकला... हा निरोप आणि निरोप देणारा महत्त्वाचा आहे. एकाच वर्गात शिकलेले आम्ही. मी शहरात निघून आलेय अन् तो गावी शेती करतो. इथं मी बिझी आहे म्हणजे ‘हाताला काम आहे’... काम आहे म्हणजे पोटापाण्याची सोय लागली आहे... थोडक्यात, बेसिक गोष्टींशी चाललेला झगडा तरी किमान संपला आहे. याऊलट त्...

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवाद ‘डायमंड प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या प्रारंभी ऑरवेल यांनी ‘नाईन्टीन एटीफोर’ या त्यांच्या शेवटच्या कादंबरीचं कच्चं लिखाण सुरू केलं. तेव्हा त्यांनी याचं शीर्षक ‘द लास्ट मॅन इन युरोप’ असं द्यायचं ठरवलं होतं. ही कादंबरी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अखेरीस पूर्ण झाली. त्यावेळी ऑरवेल यांनी ‘अठ्ठेचाळीस’ या आकड्याची अदलाबदल करून त्या कादंबरीला ‘नाईन्टीन एटीफोर’ असं नाव दिलं. हा झाला कादंबरीच्या नावामागचा इतिहास.  हुकुमशाही टोकाला गेली तर तिचे पडसाद कशाप्रकारे उमटू शकतात याचा वेध या कादंबरीतून घेण्यात आला आहे. भविष्यकाळाचं भेसूर चित्र रंगवणारी ही कादंबरी एवढी प्रभावशाली ठरली की सर्वांना एकोणीसशे चौर्याऐंशी साली या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं खरोखर घडेल असं वाटू लागलं होतं. अर्थात प्रत्यक्षात एकोणीसशे चौर्याऐंशी सालामध्ये या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं काहीही घडलं नसलं तरीही आजही ही कादंबरी समकालीन वाटावी अशी आहे. ऑरवेल या...

...पण काही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत!

Image
सन 1945 मध्ये प्रकाशित झालेली ‘अॅनिमल फार्म’ ही जॉर्ज ऑरवेल या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाची एक अजरामर कलाकृती. समाजवादी विचारसरणीकडे आकर्षित झालेल्या ऑरवेल यांनी कम्युनिझमबद्दल झालेल्या भ्रमनिरासातून ही कादंबरी लिहिली. जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म भारताच्या तत्कालीन बंगाल प्रांतातला. त्यांचे वडील तेव्हा ब्रिटिश सरकारचे एक अधिकारी म्हणून भारतात कार्यरत होते. जॉर्ज ऑरवेल यांचे खरे नाव एरिक आर्थर ब्लेअर! ‘डाऊन अॅन्ड आऊट इन लंडन अॅन्ड पॅरिस’ या आपल्या पहिल्या पुस्तकासाठी त्यांनी जॉर्ज ऑरवेल हे टोपण नाव वापरले आणि त्याच नावाने ते आयुष्यभर ओळखले जाऊ लागले. ऑरवेल यांनी सन 1943 मध्ये ही कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि 1945 मध्ये प्रकाशित केली. असे असले तरीही, आजच्या काळातही ही कादंबरी अप्रस्तुत ठरत नाही हे विशेष. ऑरवेल यांनी या कादंबरीत लिहिलेल्या अनेक प्रसंगांचे आजच्या कालखंडातही आपण अनुभव घेतच असतो. त्यामुळे ऑरवेल यांच्या या द्रष्टेपणाचे कौतुक करावे तितके थोडे. जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत ही कादंबरी पोहोचावी एवढ्याच उद्देशातून पेशाने वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक असणार्या डॉ. तुषार बापट ...

कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं...

Image
सन 1997 मध्ये प्रकाशित झालेली द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ही सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणविषयक लेखन करणार्‍या सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांची पहिलीच कादंबरी. अल्पावधीतच ही कादंबरी जगभरात लोकप्रिय झाली आणि त्याच वर्षी या कादंबरीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या पुस्तकाच्या मराठी अनुवदिका अपर्णा वेलणकर यांनाही या पुस्तकाच्या उत्कृष्ट अनुवादासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार सन 2004 मध्ये प्राप्त झाला. मूळ इंग्रजी भाषेतल्या या कादंबरीचं भाषिक सौंदर्य मराठीतही तितक्याच ताकदीनं पेललेलं आहे याचीच ही पावती म्हणावी लागेल. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या केरळच्या भूमीवर रेखाटलेलं हे कथानक केरळच्या सौंदर्याइतकंच अद्वितीय आहे. राहेल, इस्था नावाची जुळी भावंडं आणि त्यांची आई अम्मू यांची ही गोष्ट. खरं तर राहेल आणि इस्थापासून सुरू झालेली ही गोष्ट त्या दोघांपुरतीच मर्यादीत न राहता अनेक अदृश्य अशी वर्तुळं घेत घेत अधिक गहिरी होत विस्तार पावलेली आहे. अतीव प्रेम, तिरस्कार, मत्सर, त्याग, विश्‍वासघात, अपराधीपण या सार्‍या मानवी भा...

माणसाला ठार करता येईल; पण त्याची हार नाही करता येणार...

‘ एका कोळीयाने ’ ही कादंबरी म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘ द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. सुप्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांनी अनुवाद केलेलं हे पुस्तक ‘ देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा. लि ’. कडून प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकाच्या आजवर एकूण सहा आवृत्त्या प्रकाशित झालेल्या असून , पहिली आवृत्ती सन 1965 मध्ये तर सहावी आवृत्ती 2018 रोजी प्रकाशित झालेली आहे. हे पुस्तक हातात घेता क्षणीच पहिला प्रश्न असा पडतो की याचं मराठी नाव ‘ एका कोळीयाने ’ असं का बरं दिलं असावं ? या पुस्तकासाठी लिहिलेल्या आपल्या प्रस्तावनेत पुलंनी याचा खुलासा केलेला आहेच. पुलंच्या बालपणीची शाळेत असतानाची एक कविता आहे. ज्यामध्ये एका भिंतीवरच्या कोळ्यानं उंचच उंच जागी आपलं जाळं बांधलेलं असतं. पुलं म्हणतात , तो कोळी निराळा असला तरी अर्नेस्ट हेमिंग्वेंच्या कोळ्याचीसुद्धा अशीच समुद्रात अगदी दूरवर जाऊन जाळे फेकायची धडपड होती. ‘ एका कोळीयाने एकदा आपूले जाळे बांधीयेले उंच जागी ’ या कवितेतला तो कोळी आणि अर्नेस्ट हेमिंग्वेंच्या जगप्रसिद्ध कथेतला कोळी , उंचावर आणि दूरवर जायची त्या दोघां...

वाघूर...

Image
एका गावाजवळून वाहणार्या नदीचं नाव.   नाव वाचलं की कुतूहल आणि ओढ या दोन्ही गोष्टी एकदमच वाटायला लागतात. गावाशी नाळ जोडणारी कोणतीही गोष्ट शून्य मिनिटात आपलीच वाटायला लागते. 'वाघूर'च्या अंकाचं पण तसंच आहे.  याच 'वाघूर'चा दिवाळीनिमित्त 'सायकल' विशेषांक येतोय. अंकाचं मुखपृष्ठच हीच एक दीर्घ गोष्टय.  माझ्या 'गावखेड्यातल्या सायकलीसाठी' 'वाघूर'मध्ये लिहिलंय. जितेंद्र साळुंखे यांनी काढलेल्या चित्रातून या सायकली अगदी प्रत्यक्षात उतरवल्यात.  वाघूरचा हा अंक सायकलविषयी काय सांगतोय नक्की वाचा.  आजच आपली प्रत नोंदवा.  'वाघूर'ला माझ्या शुभेच्छा!      अधिक माहितीसाठी - □ वाघूर दिवाळी अंक २०२१ | सायकल विशेषांक □ मुखपृष्ठ : Anwar Husain | पृष्ठ संख्या : २४४ □ मूल्य : ३००₹ [ट.ख. सहित] पत्ता पाठवा. □ गुगल पे/ फोन पे / पेटीएम : 9766089653 ★ मराठीतील मान्यवर लेखकांच्या 'सायकल' केंद्रीत आठवणी, कथा, कविता, शोधपर लेख असलेला भरगच्च अंक वाचण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा. □ पैसे भरल्याचा मॅसेज व पत्ता व्हाट्सअप करा: 9404051543 | संपादक : Namdev Koli #waghoor ...

कधीकधी कशाचंच काहीच वाटत नाही....

सहज आठवत होते...  वेळी-अवेळी पाण्याच्या टँकरचा आवाज आला की उठायचो. तेवढं वर्ष जास्तच तापदायक गेलं. पण सवय झालेली. याच्यापेक्षा जास्तीत जास्त वाईट काय घडलं ते आठवत नाही. कधी भूकंप नाही, पूर नाही. जोराचा पाऊस नाही. आणि अगदी मरून जावं इतका दुष्काळ पण नाही. जेवढं जगलो, जसं जगलो त्यात जिव्हारी लागावं असं फार काही नाही.  खरं तर सगळ्याचीच सवय करून घेतलेली. आठवड्यातून एकदाच भाजी आणायची. किराणा पण तेव्हाच. एकाच पिशवीत. चहा पावडरचा तेव्हा काडी पेटीच्या दोन का तीन पेट्या मावतील एवढा बॉक्स मिळायचा. आठ दिवसाला पुरेल इतका.  दवाखाना खूप आजारी पडलं तरंच. पालखी, जत्रा आणि उन्हाळ्यातील लग्न सोडली तर नवीन कपडे घालण्याचा संबंध नाही.  उन्हाळा, दिवाळी सुट्टी सगळी माळावरंच घालवायची. प्रवास नावाची गोष्टच नव्हती. लाल वावरात पाहिजे तेवढं खेळायचं. कालवण नसलं तरी चटणी बरोबर भाकरीचा काला करून खायचं... लय लय दुःख करावं असं काहीच नाही. अगदी कुणाचा मृत्यूही नाही.  आणि मग कधीतरी शहरात येणं झालं. आज शहरात सगळं  मिळतंय. अंहं .... मिळवलंय. याव्यतिरिक्त आवर्जून नोंदवावं असं काही नाही.  आई...

फेणे!

Image
...दहावीची बोर्डाची परिक्षा सुरू होती आणि वस्तीवर कुणीतरी फेणे आणला होता. रात्री मी अभ्यास करताना जोडीला भाऊही चादरीत लपवून काहीतरी वाचत होता. काय आहे म्हणून बघितलं तर फास्टर फेणे! 'तुझी परिक्षा आहे तू अभ्यास कर' म्हणत त्याने पुस्तकाला हातही लावून दिला नव्हता. 'निदान चित्र तरी दाखव त्यातली' म्हणून गयावया केलं. तेव्हा पाहिलेलं फेणेचं चित्रंं आजही आठवतंय. ते पाहात असताना 'आता आपल्याला हे पुस्तक कधी वाचायला मिळणार?' या विचारानं खूप अस्वस्थ वाटलं होतं.  तो क्षण आणि फेणे तेव्हापासून लक्षातंय. गुगलवर पुस्तकं शोधत असताना कायम या पुस्तकांची कव्हरं पाहून मनाचं समाधान करून घ्यायचे. कधीतरी आख्खाच्या आख्खा संच विकत घ्यायचा ठरवलं होतं. पण अगदी रानडेला गेल्यावरही कधी उत्कर्षला जाणं झालं तरी आणि एरवीही कुठल्या दुकानात जाऊन विकत घ्यायची हिंमत कधीच झाली नाही. पुण्यात संमेलन लागलं आणि तिथे पुन्हा फेणे दिसला. पहिल्या दिवशी पाहूनच मनाचं समाधान करून घेतलं. पण दुसर्या दिवशी पुन्हा ती पुस्तकं इतक्या जवळ असूनही आपण घेऊ शकत नाहीये या विचारानं अजूनच कसंतरी वाटायला लागलं. शेवटी मनाची हिंम...

आमचं गावच साताराय...

स्वारगेटला असे बरेच वयस्कर लोक भेटतात. ज्यांना गावाकडनं एसटीत बसवून दिलेलं असतं. स्वारगेटला उतरलं की पुढं त्यांचं त्यांनी बघायचं. एखादा नोकीया आणि कागदाच्या चिटूर्या...

निघालेली माणसं... निघालेला प्रवास...

ते गाणं आठवतंय का? ज्यात सगळे लोक निघालेले असतात. हातात, डोक्यावर सामान घेऊन... आपला सनी देओलपण ट्रकमधून अमिशा पटेलला सोडायला निघालेला असतो. प्रसंग फाळणीचा आहे. सगळीकडं भगभ...